शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (21:35 IST)

धक्कादायक ! दुसऱ्या पत्नीसाठी पहिल्या पत्नीला ‘शॉक’ देत जीवे मारण्याचा प्रयत्न

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुसऱ्या पत्नीसाठी नवऱ्याने पहिल्या पत्नीला चक्क ‘शॉक’ देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पती, त्‍याची दुसरी पत्नी आणि सासर्‍याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी तिरसिंग पटले (रा. तळोदा) असे पीडित महिलेचे नाव आहे.
 
याबाबत माहिती अशी, ही घटना 7 ऑक्टोबर 2021 रोजी ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.पती मुकेश जयसिंग खर्डे आणि त्यांची दुसरी पत्नी गीता खर्डे यांनी आमच्या घरातून निघून जा, असा तगादा लावला.यासाठी मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरु केले.पती मुकेश आणि गीता या दाेघांनी शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली.आमच्‍या घरातून निघुन जा, असे सांगत सासरे जयसिंग यांनी देखील शिवीगाळ  करुन ढकलून दिले.असं फिर्यादी महिलेनं सांगितलं आहे.
 
त्याचबरोबर, पती मुकेश व त्याची दुसरी पत्नी गिता हिने लक्ष्‍मी यांचा हात धरुन घरातील इलेक्ट्रीक बल्ब सॉकेट जवळ ओढत नेले.तेव्हा शॉक लागल्याने लक्ष्मी खर्डे या जमीनीवर कोसळल्या आणि बेशुध्द झाल्या.दरम्यान, तळोदा तालुक्यातील मालदा येथे मुकेश याच्या खर्डे यांच्या राहत्या घरी ही घटना घडली आहे.याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास पोलिस करत आहेत.