बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (16:36 IST)

भोसरी भुखंड घोटाळा प्रकरण ! एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे ED कार्यालयात हजर

पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भुखंड घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने  समन्स बजावले होते. यामुळे मंदाकिनी खडसे या आज (मंगळवारी) सक्तवसुली संचालनालय विभागात दाखल झाल्या आहेत.
 
याप्रकरणी मंदाकिनी खडसेनी मुंबई सेशन न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.परंतु  12 ऑक्टोबर रोजी सेशन न्यायालयाकडून त्यांचा हा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता.मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात खडसे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे त्यांनी अटक होण्याचीही शक्यता आहे.त्याचबरोबर एकनाथ खडसे यांना प्रकृतीच्या कारणामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.दरम्यान, या प्रकरणी 21 ऑक्टोबरला पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे.
 
दरम्यान, गेल्या महिन्यात ED ने एकनाथ खडसे  आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.ED कडून 1 हजार पानांचे आरोपपत्र  दाखल करण्यात आले आहे.या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह 3 कंपन्यांचा देखील आरोपी म्हणून समावेश आहे.या सर्वांवर ED कडून मनी लॉड्रिंगचा आरोप लावला  आहे.
दरम्यान, भोसरी एमआयडीसीमधील सर्व्हे नंबर 52 मधील ३ एकर जागेचा हा वाद ही जमीन खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी चौधरी यांनी अब्बास उकानी या व्यक्तीकडून खरेदी केली. 3 कोटी 75 लाख रुपयांना जमिनीची खरेदी पुण्यातील उपनिबंधक कार्यालयात या व्यवहाराची नोंद स्टँप ड्युटी म्हणून एक कोटी 37 लाख रुपये भरण्यात आले. मात्र, ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची असल्याचं उघड झालं आहे.