बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021 (09:45 IST)

गरोदर महिला चालत्या ट्रेन मधून पडली,RPF जवानाने महिलेचे प्राण वाचवले, व्हिडीओ व्हायरल

मुंबई. महाराष्ट्रातील कल्याण रेल्वे स्थानकावर एक गर्भवती महिला चालत्या ट्रेनमधून अचानक पडली. तेव्हाच एक आरपीएफ जवान एखाद्या देवदूता प्रमाणे येतो आणि त्याचा जीव वाचवतो. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
 
 एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमध्ये, महाराष्ट्रातील कल्याण रेल्वे स्थानकावरून सोमवारी एक ट्रेन निघताना दिसत आहे. दरम्यान, प्रवाशांमध्ये ट्रेनमध्ये चढण्याची आणि उतरण्याची स्पर्धा आहे. दरम्यान, ट्रेनमधून एक गर्भवती महिला प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा प्रयत्न करताना तिचा पाय घसरतो.
 
त्यानंतर प्लॅटफॉर्म वर उपस्थित असलेल्या आरपीएफचे एक जवान  एस.आर.खांडेकर यांची दृष्टी या महिलेवर पडते आणि ते धावत जाऊन तिला ट्रेनच्या खाली येण्या पासून रोखण्यासाठी उडी घेऊन त्या गरोदर महिलेला ओढून तिचा जीव वाचवतात. 

असे सांगितले जात आहे की चंद्रेश नावाचा माणूस आपल्या मुलासह आणि 8 महिन्यांच्या गर्भवती पत्नीसह गोरखपूर एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी कल्याण रेल्वे स्टेशनवर पोहोचला होता. चुकून ते दुसऱ्या गाडीत शिरतात. ट्रेन सुरू झाल्यावर त्यांना चुकीच्या ट्रेनमध्ये चढल्याची माहिती मिळाली. यानंतर प्रत्येकजण खाली उतरू लागला आणि या दरम्यान चंद्रेशची गर्भवती पत्नी खाली पडली, तिला आरपीएफ जवानाने देवदूता प्रमाणे धावत येऊन वाचवले.