रविवार, 8 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2022 (23:43 IST)

कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना अर्थसहाय्य देण्याचा शिंदे सरकारचा मोठा निर्णय

shinde
कोरोना काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु असून सर्व काही बंद करण्यात आलं होते. कोरोनाकाळात अनेक लोकांचे काम गेले.त्याचा परिणाम चित्रीकरणावर देखील झाला. कोरोनाकाळात चित्रीकरण देखील बंद करण्यात आल्यामुळे अनेक कलाकारांना उपास मार सहन करावा लागला.काम नसल्यामुळे कलाकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. या कलाकारांच्या मदतीसाठी राज्य सरकारने अर्थ साहाय्य देण्याची घोषणा केली असून मदतीचा हात पुढे केला आहे. या कलाकारांना दिले जाणाऱ्या अर्थ साहाय्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ही माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 
 
समूह लोकपथकांचे मालक/निर्माते यांनी विशेष कोविड अनुदान पॅकेज एकरकमीचे  मिळविताना सादर करावयाच्या कागदपत्रे आणि निवडपद्धतीमध्ये बदल करण्यात आला असून पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत परिपत्रक काढले आहेत. सदर परिपत्रक www.maharashtra.gov.in या संकेस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच एकल कलाकारांची निवड पद्धती आणि अर्जासह लागणारी कागदपत्रे तसेच वार्षिक उत्पन्न रुपयांची मर्यादा 48 हजार रुपयां ऐवजी 50 हजार करण्यात आल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 
 
Edited By- Priya Dixit