1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 19 मार्च 2023 (11:03 IST)

उद्धव ठाकरे खेडमध्ये अफजल खानासारखे आले होते – रामदास कदम

ramdas kadam
काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर टीका केली होती.उद्धव ठाकरेंना उत्तर देण्यासाठी आता शिंदे गटानं खेडमधील त्याच मैदानात एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित केलीय. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.या सभेपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
 
रामदास कदम म्हणाले की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात कधीच बाहेर पडले नाहीत. तेव्हा बळीराजा कुठे गेला होता. तेव्हा त्यांचं शहाणपण कुठे गेलेलं? आता उद्धव इथे सभा घ्यायला अफजल खानासारखे अख्ख्या महाराष्ट्रातून सर्व लोकांना घेऊन आले. आता त्यांना उत्तर देण्यासाठी आम्ही सभा घेतोय. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी बळीराजासाठी एकही निर्णय घेतला नाही.”
 
तसंच, “ही सभा (खेड) आम्ही आयोजित केली आहे, कारण उद्धव ठाकरे म्हणाले होते की, कोकण त्यांच्यासोबत आहे. कोकण त्यांच्यासोबत नाही, कोकण हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, हे सांगण्यासाठी, यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ही सभा आयोजित केली आहे. ही एक ऐतिहासिक सभा होईल,” असं रामदास कदम म्हणाले.

Published By- Priya Dixit