बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

साईबाबांच्या पादुका चेन्नईकडे रवाना

साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यानिमित्ताने साईबाबांच्या पादुका शिर्डी बाहेर नेण्यास विरोध करीत छत्रपती शासन व ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण केले. मात्र, त्यास न जुमानता साईबाबा संस्थानने चेन्नईकडे पादुका रवाना केल्या आहेत. त्यामुळे संस्थान 
 
ग्रामस्थांच्या विरोधापुढे झुकले नाही. तर साईबाबांचा पादुका न नेण्याचा कौल डावलल्याने श्रद्धाळूंनी या चेन्नई दौर्‍यानिमित्ताने चिंता व्यक्त केली आहे. 
 
दरम्यान, नगरसेवक शिवाजी गोंदकर यांनी मध्यस्थी करीत उपोषणकर्त्यांची समजूत घातली. त्यांनी सांगितले की, साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी संदेशाद्वारे कळविले आहे की, चेन्नईत होणार्‍या कार्यक्रमासाठी तेथील भाविकांनी मोठा खर्च केला आहे. 
 
तिथे साईबाबांच्या पादुका दर्शनासाठी येणार असल्याचा प्रचार व प्रसार झालेला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी चेन्नई दौरा होऊ द्यावा, अशी विनंती केली आहे असे सांगून उपोषण सोडण्यास सांगितले.