गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

साई शिर्डी आता रात्री पूर्ण बंद

संपूर्ण जगात आणि देशात शिर्डी साई बाबा प्रसिद्ध आहेत. एक गुरु म्हणून अनेक नागरिक शिर्डी साई बाबा यांच्या कडे पहातात. तर दुसरीकडे  अनेक अपराध या ठिकाणी झाले आहेत. त्यावर एक उपाय म्हणून सर्वांनी निर्णय घेतला आहे. 
आता शिर्डीतील व्यवसाय रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत बंद ठेवले जाणार आहे. शिर्डी ग्रामस्थ आणि पोलीस यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला  आहे. तर येत्या रविवारी रात्रीपासून निर्णयाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

साई मंदिर रोज सकाळी 4.30 वाजता काकड आरतीसाठी उघडले जाते. तर रात्री 10.30 वाजता शेजारती केल्यावर मंदिर बंद होते. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय देवस्थान असा दर्जा आहे.

शिर्डीत गेल्या काही दिवसांपासून चोऱ्या, पाकीटमारीसारख्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. यातून टोळ्या निर्माण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी ग्रामस्थ आणि पोलीस यांनी संयुक्त बैठक घेऊन, यात रात्री उशिरापर्यंत सुरु राहणाऱ्या हॉटेल, हातगाड्या या रात्री 11 नंतर सकाळी 5 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .

या निर्णायाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता तरी शिर्डी परिसर उत्तम होईल का असा प्रश्न निर्माण होतो.