1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (10:29 IST)

नितेश राणेंच्या 'त्या' ट्वीट विरोधात शिवसैनिकांनी तक्रार दाखल केली

Shiv Sainiks lodged a complaint against Nitesh Rane's 'that' tweet
भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी केलेल्या ट्वीटमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी होत असून दोन समाजात तेढ निर्माण केली असल्याची तक्रार शिवसैनिकांनी केली आहे. 
 
मुंबईतील काळाचौकी वरळी आणि भोईवाडा पोलीस ठाण्यात नितेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी वीर जिजामाता उद्यानाचे नाव रातोरात बदलून हजरत पीर बाबा अशी कोनशीला लावून बदलले असल्याचे ट्वीट केले होते. या ट्वीटसह त्यांनी फोटो पोस्ट केला. भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या ट्वीटचे पडसाद उमटले आणि ट्वीटमधील माहिती दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले गेले.
 
यावर शिवसेना आक्रमक झाली असून नितेश राणे यांच्या ट्वीट विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली आहे. आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाहक बदनामी केली तसेच खोटी बातमी पसरवून दोन समाजात तेढ निर्माण केली आहे, असे तक्रारीर म्हटले गेले आहे.