बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

शिवसेनेनेकडून मोदींवर उपहासात्मक टीका

‘ना गाली से, ना गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से’ असं म्हणत तणावग्रस्त जम्मू काश्मीरवर पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं. त्यावरुन शिवसेनेने मोदींवर उपहासात्मक टीका केली.  सैनिकांनो बंदुका मोडा, काश्मिरींना मिठ्या मारा” असा उपहासात्मक टोमणा ‘सामना’तून पंतप्रधान मोदींना मारण्यात आला.

तसंच आतापर्यंत असा विचार कसा कुणालाच सुचला नाही, याचं आश्चर्य वाटतं. पण हा विचार अंमलात आणण्यासाठी, काश्मिरातलं कलम 370 हटवा म्हणजे सर्व जनता काश्मिरात जाऊन तिथल्या लोकांची गळा भेट घेईल, असाही टोला लगावण्यात आला आहे. काश्मीरचा हिंसाचार व अतिरेक मोडून काढण्यासाठी पंतप्रधानांनी जो गांधी विचार लाल किल्ल्यावरून मांडला त्यामुळे आम्हीच काय, देशही निःशब्द झाला असेल असे म्हटले आहे.