मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified मंगळवार, 5 जुलै 2022 (21:32 IST)

उदय सामंत, योगेश कदमांना शिवसेनेचे दरवाजे बंद- विनायक राऊत

shivsena
चिपळूण “शिवसेनेशी गद्दारी करून बाहेर गेलेल्या उदय सामंत, योगेश कदमांसह बंडखोर आमदारांना पुन्हा शिवसेनेत थारा नाही. त्यांना शिवसैनिक म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकारच नाही.” असे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी चिपळूणात सांगितले.
 
रत्नागिरीत 10 जुलै रोजी होणाऱ्या शिवसेना मेळावा होणार आहे. या मेळाव्याला राज्यभरातील शिवसैनिक येणार असून या मेळाव्यात कोकणातील काही ठिकाणच्य़ा पक्षाच्या कर्यकारणीची पुनर्रचना केली जाणार असल्याची माहिती शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी येथे दिली.
 
पुढे बोलताना विनायक राऊत म्हणाले की, “10 जुलै रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्याला गद्दार आणि बंडखोर आमदारांना प्रवेश नाही. सत्तेची चिंता असलेले व्यावसायिक राजकारणी नेहमीच उड्या मारतात. शिवसेनेशी गद्दारी करून बाहेर गेलेल्या उदय सामंत, योगेश कदमांसह बंडखोर आमदारांना पुन्हा शिवसेनेत थारा नाही. त्यांना शिवसैनिक म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकारच नाही.”