सोमवार, 20 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 15 जुलै 2021 (23:06 IST)

शिवसेनेकडून स्वप्नीलच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत

Shiv Sena
एमपीएससी परीक्षा उत्तीण होऊन नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली होती. आता शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मृत स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत कुटुंबीयांचे सांत्वन केलं आहे. तसेच शिवसेनेकडून स्वप्नीलच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची मदत करण्यात आली असून स्वप्नीलच्या बहिणीच्या शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे आश्वासनही दिले आहे.
 
महाराष्ट्र सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी असे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ३१ जुलै अखेरपर्यंत १५,५०० हजार पदांची भरती करण्याची घोषणा सरकारने केली असून त्याबाबतची कार्यवाही सुरू देखील केली असल्याचे त्यांनी सांगितले. एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन शिंदे यांनी गुरुवारी त्यांची आस्थेने विचारपूस केली.