शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (17:24 IST)

राज्याबाहेर शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला

दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणूकीत (Daddra Nagar Haveli Loks Sabha bypolls result) शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. शिवसेनेचा उमेदवार कलाबेन डेलकर (Shiv Sena Kalaben Delkar wins) यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात दमदार विजय मिळवला आहे. लोकसभेच्या रिक्त जागांसह विविध राज्यातील रिक्त विधानसभेच्या जागांचे निकाल आज लागले. महाराष्ट्राचं नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसह दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलेलं होतं. खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे केंद्र शासित प्रदेश असलेल्या दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघात निवडणूक झाली. याठिकाणी डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली होती.
 
कलाबेन डेलकर यांनी पोटनिवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. 30 ऑक्टोबरसाठी मतदान झालं होतं. त्यांच्याविरोधात भाजपने महेश गावित यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी गावित यांचा पराभव केला. कलाबेन डेलकर यांनी तब्बल 51 हजार मतांनी विजय मिळवला असून, भाजपला मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला आहे.