शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (08:25 IST)

भाजपला सत्तेची चरबी चढलीय; शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांची टीका

भाजपला सत्तेची चरबी चढली असल्याची टीका शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलीये.. जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते रामेश्वर नळगे यांच्या शिवसेना जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.
काही लोकांना वाटतं सत्ता कधीच जाणार नाही.. लोकांना वाटत होतं मुघल कधी जाणार नाहीत पण इंग्रज आले आणि मुघल गेले त्यानंतर इंग्रज कधी जाणार नाही असं वाटत होतं मात्र तेही गेले..तसं भाजप सुद्धा जाणार असल्याचं सत्तार यांनी म्हंटलंय.. त्यामुळं भाजपला सत्तेची चरबी चढली असून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याची टीका सत्तार यांनी केलीये.