मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (08:18 IST)

दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मुलाला ‘या’ आजीकडून ‘ऑफर’ अन् ‘सल्ला’

राज्याच्या राजकारणातील असे अनेक नेते आहेत ते त्यांच्या कामामुळे किंवा त्यांच्या सुसंस्कृत व सभ्यतेसाठी ओळखले जातात. त्या नेत्यांनी कायमस्वरुपी लोकांच्या मनात एक स्थान मिळवले आहे. त्यामध्ये एक नाव आहे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर पाटील यांचे. आर.आर. आबांचा मुलगा रोहित पाटील  देखील आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवला आहे.
 
शनिवारी रोहित पाटील हे सांगलीतील ) तासगावमध्ये असताना एका आजीने त्यांना हक्काने काही सूचना  दिल्या, सोशल मीडियावर  याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची  चर्चेचा विषय ठरत आहे. दिवंगत आर.आर. पाटील यांचे चिरंजिव रोहित पाटील तासगाव मध्येअसताना त्यांना वाटेत दोन आजी भेटल्या. रोहित यांनी आजींची मायेने विचारपूस केली.
 
त्यावेळी आजीनेच रोहित यांना मायेने आणि हक्काने काही सल्ले दिले तर काही सूचना केल्या.आजीबाईंच्या या हक्काने दिलेल्या सूचनांचा रोहित यांनी देखील प्रेमाने आणि आपुलकीने स्विकार करीत आशिर्वाद घेतले.या प्रसंगाचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या व्हिडिओला कॅप्शन देत ते म्हणतात की,तासगाव येथे असताना या आज्जी भेटल्या. त्यांनी दिलेल हे प्रेम आणि ठेवलेला विश्वास नक्कीच सार्थ करेन. व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी शेअर केला आहे.रोहित तरुण नेते आहेत तसेच त्यांच्या विचार आणि वागणूकीवरही वडिलांची छाप दिसते. अशा प्रतिक्रिया अनेक नेटकरी देत आहेत