गुरूवार, 30 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (22:58 IST)

मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेतील ११ भाजप नगरसेवकांनी बांधले शिवबंधन

Shivbandhan was built by 11 BJP corporators from Muktainagar and Bodhwad municipalities
जळगावात भाजपला चांगलाच धक्का बसलाय. मुक्ताईनगर आणि बोधवड नगरपालिकेतील ११ भाजप नगरसेवकांनी शिवबंधन बांधल्याने भाजपला मोठं खिंडार पडल्याचं मानलं जातंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ११ नगरसेवकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. हे सर्व नगरसेवक एकनाथ खडसे यांचे समर्थक मानले जातात. प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना नेते तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्व नगरसेवकांच्या हातावर शिवबंधन बांधलं. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर अनेक भाजप नगरसेवकांसह पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर गेले होते. मात्र, आता आगामी निवडणुकांचे पडघम वाजू लागताच खडसे समर्थक नगरसेवकांनी शिवबंधन बांधलं. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीवेळीदेखील शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक सेनेत आणत भाजपला धक्का दिला होता. त्यानंतरचा हा दुसरा धक्का मानला जातो आहे.