शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (22:47 IST)

किरीट सोमय्या यांना कोणी रोखू नये, मी सर्वांना हात जोडून विनंती करतो : हसन मुश्रीफ

भाजप नेते किरिट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर दोन साखर कारखान्यांधमध्ये कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप केला. कोल्हापूरच्या हद्दीत पोहचण्याआधीच सोमय्या यांना कराड इथं पोलिसांनी रोखलं. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा कोल्हापूर दौऱ्याची घोषणा केली असून 28 सप्टेंबरला हा दौरा नियोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. किरीट सोमय्या यांना कोणी रोखू नये, मी सर्वांना हात जोडून विनंती करतो कोणी कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असं वर्तन करु नये, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. तसंच ते काय करतात ते त्यांना करु द्या, जे विरोध करतील ते माझे कार्यकर्ते नाहीत, कार्यकर्त्यांना आवर घालण्याचं काम माझं असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
 
हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या यांनाही विनंती केली आहे. सोमय्या यांनी देखील कायदा-सुव्यवस्था निर्माण होईल असं वर्तन किंवा वक्तव्य करु नये, सोमय्या यांनी आल्यावर आमचं काम कसं आहे हे पाहावं, अशी विनंती मुश्रीफ यांनी केली आहे. तसंच गेल्या 5 वर्षात तुमचं सरकार होतं, त्यावेळी का चौकशी झाली नाही.
 
केंद्री यंत्रणेचा गैरवापर करण्याचं काम सुरु असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे. मी सातत्याने आवाज उठवला म्हणून माझ्यावर आरोप करण्यात आल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. कोणताही आरोप करायला हरकत नाही, पण जुनी प्रकरण काढून आरोप करणं चुकीचं असल्याचंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.