महिला पोलिसांना 12 तास नाही, तर 8 तास ड्युटी
महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने महिला पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महिला पोलिसांच्या कामाचे तास आता कमी केले आहे. ज्यामुळे आता महिला पोलिसांना 12 तास नाही, तर 8 तास काम करावे लागणार आहे. राज्याचे डीजीपी संजय पांडे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
सध्या पोलीस दलात काम करणाऱ्या महिलांना 12 तास ड्युटी करावी लागत आहे. महिला पोलिसांना कामाबरोबरच कौटुंबिक जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागतात. कधीकधी त्यांना सणांच्या दिवशी देखील आपल्या कर्तव्याचे पालन करावे लागतात. तर काही वेळा गंभीर परिस्थितीत त्यांना तास 12 पेक्षा जास्त जातात काम करावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या घरात आणि बाहेर दोन्ही पार पाडणे खूप कठीण होते. या सगळ्याचा विचार करुन महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेण्याचा विचार केला आहे. ज्यामुळे महिला पोलिसांना कुटुंब आणि नोकरीमध्ये समतोल राखणे सोपे झाले आहे.