शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (18:35 IST)

पायलट कोरोना लस लावल्यानंतर 48 तास विमान उड्डाण करू शकणार नाही

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने(डीजीसीए)म्हटले आहे. की कोविड -19 च्या लसीकरणानंतर पायलट आणि क्रू मेम्बर्स(केबिन क्रू) 48 तास विमानसेवा चालविणार नाही.  
 
डीजीसीएने मंगळवारी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की लसीकरणाच्या 48 तासांनंतर कोणतीही लक्षणे दिसली नाही तर त्यांना उड्डाण सेवा देण्यात येईल. 
पायलट आणि चालक दल सदस्यांची लसीकरण झाल्यानंतर अर्ध्या तासासाठी लसीकरण केंद्रात लक्ष ठेवले जाईल. 
  
डीजीसीएने सांगितले की लसीकरणानंतर 48 तासांपर्यंत क्रू मेंबर्स वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरतील.
 
48  तासानंतर पायलटमध्ये काही लक्षणे आढळल्यास त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. डीजीसीए ने असे सांगितले आहे की लसीकरणानंतर पायलट 14 दिवसांपेक्षा जास्तकाळ अयोग्य राहिल्यास त्यांना उड्डाण करण्याची परवानगी देण्यापूर्वी त्यांची विशेष वैद्यकीय तपासणी केली जाईल.