बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, शिवप्रतिष्ठानचा इशारा

किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या वादात आता शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनीही उडी घेतली आहे. इंदुरीकर महाराजांना संभाजी भिडे यांनी पाठिंबा दिला आहे. तसंच इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा इशाराही दिला आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते नितीन चौगुले यांनी हा इशारा दिला आहे.
 
“सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो, विषम तिथीला स्त्री संग झाला तर मुलगी होते. टायमिंग हुकलं की क्वालिटी खराब.” त्यांच्या याच वक्तव्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा अशी भूमिका घेतली आहे. मात्र इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला तर संभाजी भिडे रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते नितीन चौगुले यांनी म्हटलं आहे.