गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020 (16:44 IST)

बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली : निलेश राणे

shivsena
आणीबाणीत अटक होऊ नये म्हणून बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांच्याशी मांडवली केली, अशा शब्दात भाजपाचे नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘भाजपला वीर सावरकरांचा खोटा पुळका आहे. वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होते, स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा ‘संघ’ परिवार कोठे होता?,’ असा सवाल शिवसेनेने आपल्या सामनाच्या संपादकीयमधून केला होता. त्यावर राणे यांनी ट्विटरवरून निशाणा साधला आहे.
 
“बाळासाहेब होते का स्वतंत्र्य लढ्यात? की त्यांच्या अगोदर कोण ठाकरे होते? अटक होऊ नये म्हणून आणीबाणीत इंदिरा गांधींशी मांडवली केली. बाळासाहेबांनी तो इतिहास लोकं विसरलेली नाही,” अशा आशयाचं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.