मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 5 डिसेंबर 2021 (12:20 IST)

धक्कादायक ! बीडच्या शाळेत शिक्षिकेने मुख्याध्यापकांशी वाद झाल्यामुळे विषप्राशन केले

बीड जिल्ह्यात माजलगाव शहरापासून सुमारे 30 किमी अंतरावर राजेवाडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेच्या एका शिक्षिकेने मुख्याध्यापकांशी वाद झाल्यावर टोकाचे पाऊल घेत शाळेतच विष प्राशन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 
शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. संगीता राठोड असे या शिक्षिकेचे नाव आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या आणि मुख्याध्यापक शिवाजी जिंकलवाड यांच्यात वाद सुरु आहे. यांच्या वादाला कंटाळून गावकऱ्यांनी शाळा बंद ठेवली होती. शनिवारी  पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि मी शाळेतच विषप्राशन करून आत्महत्या करते असं म्हणत त्यांनी शाळेतच विषप्राशन केले. गावकऱ्यांनाहे कळतातच त्यांनी तातडीने शिक्षिकेला माजलगावातील रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे समजले आहे.