सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (13:16 IST)

धक्कादायक! अंधेरीत अंगावर शिंकल्याने सॅनिटायझर टाकून पेटवलं

fire
सध्या देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा तोंडवर काढत आहे.मास्क आणि सेनेटायझरचा वापर केला जात आहे.अंगावर शिकल्याने एका अल्पवयीन मुलाने शिकणाऱ्या इसमाच्या तोंडावर सेनेटायझर टाकून पेटवण्याची घटना घडली आहे.या घटनेच्या आरोपी मुलाला अटक करून त्याला बालसुधार गृहात पाठवणी केली आहे. 

अंधेरीत एका 16 वर्षाच्या मुलगा आपल्या मित्रांसह नमाज पठण करण्यासाठी जातो. काही वेळातच हा घरी रडत येतो. घरी आल्यावर त्याच्या कुटुंबियांना त्याच्या चेहरा आणि कानाजवळचा काही भाग जळालेला दिसला. त्याच्या आजीने बाब विचारले असता. त्याने एका अल्पवयीन मुलाचे नवा घेत आजीला सांगितले की, मी आणि माझा मित्र मोबाईल पाहत असताना आरोपी त्यांच्या जवळ उभा राहतो.

त्याच वेळी पीडित मुलाला शिंक आली आणि त्याने चुकीने आरोपी मुलावर शिंकला. या गोष्टीचा त्याला राग आला आणि आरोपी मुलाने सोबत आणलेले सेनेटायझर पीडित मुलाच्या तोंडावर फेकले नंतर लायटरने पेट दिला. पीडित मुलाच्या सोबत असलेल्या त्याच्या मित्राने आग विझवून पीडित मुलाचा जीव वाचवला. पीडित मुलाच्या आजीने मुलाला रुग्णालयात दाखल केले असून डी.एन. नगर पोलीस ठाण्यात आरोपी मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी मुलगा अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची रवानगी बाल सुधार गृहात केली आहे.  
 
Edited By- Priya DIxit