शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 22 नोव्हेंबर 2022 (11:42 IST)

धक्कादायक ! प्रेम प्रकरणातून स्वतःला पेटवून प्रेयसीला मिठी मारली, तरुणाचा मृत्यू

संभाजीनगर येथे प्रेम प्रकरणातून स्वतःला पेटवून प्रेयसीला मिठी मारण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. गजानन मुंडे असे या तरुणाचे नाव असून तो संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातून पीएचडी करत होता. त्याचे एका तरुणीवर प्रेम होते. त्याने तरुणीला लग्नाची मागणी घातल्यावर तिने नकार दिला त्यावर रागाच्या भरात येऊन आधी तरुणीला रॉकेल टाकून पेटवून घेतले नंतर स्वतःला पेटवून घेतले. नंतर त्याने तिला मिठी मारली.

ते दोघे गंभीर भाजले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  या प्रकरणात तरुणी 50 टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर तरुण गजानन याचा मृत्यू झाला आहे. 
या प्रकरणात तरुणीच्या जबाबा वरून तरुणाच्या आईवडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाच्या आईवडिलांनी तिच्यावर तरुणाशी लग्न करण्यासाठी दबाब आणला असून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. 

Edited By- Priya Dixit