गुरूवार, 28 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (21:12 IST)

अब्दुल सत्तार यांच्या मुलीला 2017 पासून तर आजतागायात पगार मिळत असल्याची धक्कादायक माहिती

Abdul Sattar's daughter is getting salary since 2017
टीईटी परीक्षेच्या अपात्र यादीत माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या 3 मुली आणि एका मुलाचं नावं असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. उजमा, हुमा, हीना अशी मुलींची नावं आहेत. तर अमीर सत्तार असं मुलाचं नाव आहे.
 
या चारही जणांचं टीईटी प्रमाणपत्र रद्द झालंय. 'पण, माझ्या मुलानं परीक्षा दिलीच नाही मग अपात्र यादीच नावच आलं कसं?' असा सवाल उपस्थित केला आहे. तर मुली परीक्षेत नापास झाल्या होत्या, आमच्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचं सत्तारांनी म्हटलंय.
 
मात्र आता टीईटी घोटाळ्यात नाव आलेल्या सत्तार यांच्या मुलीला 2017 पासून तर आजतागायात पगार मिळत असल्याची सुद्धा धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. हीना कौसर अब्दुल सत्तार शेख यांना टीईटी परीक्षेत अपात्र असताना 2017 पासून पगार सुरु आहे.
 
याबाबत शाळेने वेतन बिल सादर केलं असून त्यामध्ये हीना कौसर अब्दुल सत्तार शेख पूर्णतः पात्र असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे त्यांना पगार सुरू असल्याचा खुलासा यावेळी शिक्षण विभागाने केला. शिक्षण उपसंचालक कार्यालयातून पात्रता निकष पडताळणी केली जाते त्यानुसार आमच्या कार्यालयातून पगार पत्रक निघतात असेही शिक्षण विभाग सांगितले आहे.
 
अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण
हे प्रकरण समोर आल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण दिलं. 'मला बदनाम करण्याचा डाव असल्याचं' अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. 'आमची चूक असेल तर आमच्या मुलांवर कारवाई करावी.