रविवार, 4 डिसेंबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (15:34 IST)

धक्कादायक बातमी ! औरंगाबाद मध्ये दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला, दोन महिलांवर बलात्कार केला

औरंगाबाद जिल्ह्यातील तोंडली गावात बुधवारी रात्री काही दरोडेखोरांनी लूट केली आणि दोन महिलांवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे औरंगाबाद हादरले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन प्रकरणाचा तपास करत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात तोंडली गावात शेतवस्तीत काही सशस्त्र दरोडेखोरांनी लूटमार करून धुमाकूळ घेतला .आणि दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे गावात दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन्ही महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले आहे. या घटनेमुळे औरंगाबाद हादरले आहे.