शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (14:59 IST)

दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी दिला संप करण्याचा इशारा

एसटी कर्मचाऱ्यांनी कोरोना आणि पगार वेळेवर होत नसल्या मुळे आर्थिक फटका बसला आहे.लोकांना कुटुंबाला सांभाळणे अवघड झाले आहे.या त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे.एसटीच्या कर्मचाऱ्याच्या संघटनाच्या कृती समितीने संपाची हाक दिली आहे. त्यांनी विभागीय कार्यालयावर जाऊन निदर्शने केली. मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यव्यापी संप पुकारण्यात येईल. संपाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.असे सांगितले आहे.  महामंडळाचा समावेश सरकारी सेवेत करावा.तसेच महामंडळाने महागाई भत्तेत वाढ करावी दिवाळी पूर्व थकीत महागाई भत्ता आणि ऑक्टोबरचे वेतन दिवाळी पूर्वी द्यावे अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बारणे यांनी केली आहे. 
 
कोविड 19 मुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नाही. कर्मचारी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. सणासुदीच्या काळात उधारी घ्यावी लागत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि महागाई भत्ता दिला जावा. जेणे करून त्यांना देखील सण साजरा करता येईल.अशी मागणी करण्यात आली आहे.