बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (23:27 IST)

नागपूरमध्ये दुकानांच्या वेळात बदल होणार, कोरोना वाढला

नागपुरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लावण्यावर काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भर दिला आहे. 
 
नागपूरमध्ये सध्या असलेल्या दुकानांच्या वेळात बदल करण्यात येणार आहेत.तसचे हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळेत देखील बदल करण्यात येणार असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात चर्चा झाली असून एकमत झाल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यां सोबत चर्चा करुन कोरोना निर्बंध आणि लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
 
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे की, कोविड १९ संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत जी आकडेवारी समोर आली आहे ती लक्षात घेता शहरात आणि ग्रामीण भागात पुन्हा कडक निर्बंध लावावे लागणार आहेत. आतापर्यंत आकडेवारी एकेरी होती मात्र आता ती दोन नंबरी झाली आहे. १३ पॉझिटिव्ह रुग्ण  सापडले आहेत.
 
काही प्रतिबंधात्मक उपाय आम्हाला करावे लागणार आहेत. रेस्टॉरंटच्या वेळा १० वाजेपर्यंत आहेत त्या ८ वाजेपर्यंत करण्यात येतील. दुकाने ८ पर्यंत असून ते ४ पर्यंत ठेवण्यात येतील विकेंडला दुकाने बंद राहतील. गणेशोत्सवाच्या काळात गर्दी होऊ नये यासाठी आवाहन केलं आहे. मात्र तरिही नागरिकांना काळजी घ्यावी लागेल. ग्रामीण भागातील सर्व रुग्णालयांची माहिती घेतली असून त्यावरही उपाय करण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेने जिल्ह्यात पदार्पण केलंय यामुळे निर्बंध कडक करणे लोकांच्या जिवितासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत यामुळे निर्बंध लागू करण्यात येणार आहे. सर्व घटकातील, मीडिया, हॉटेल मालक आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन ३ दिवसांमध्ये निर्बंध लागू करण्यात येतीलअसे नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.