शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 ऑक्टोबर 2021 (21:39 IST)

शिर्डीतील श्री साईबाबांचा पुण्यतिथी उत्सवास आज उत्साही वातावरणात प्रारंभ

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने १०३ वा श्रींच्‍या पुण्‍यतिथी उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली.
यावेळी साईबाबांच्‍या प्रतीमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. मिरवणूक व्‍दारकामाई मंदिरात आल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणास प्रारंभ झाला.
मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी प्रथम, उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी व्दितिय, प्रशासकीय अधिकारी दिलीप उगले यांनी तृतिय व वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे यांनी चौथ्‍या अध्‍यायाचे वाचन केले.
यावेळी साई संस्‍थानच्‍या सीईओ भाग्‍यश्री बानायत यांनी पोथी, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी वीणा आणि मुख्‍यलेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब शिंदे व प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे आदी उपस्थित होते.