शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 10 जानेवारी 2018 (11:13 IST)

सिद्धीविनायक गणपतीचे दर्शन १० ते १४ जानेवारी बंद

मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धीविनायक गणपतीचे दर्शन १० ते १४ जानेवारी या दिवशी बंद राहणार आहे. माघी गणेशोत्सवनिमित्त सिंदूर लेपन करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात भाविकांना सिद्धीविनायकाचे थेट दर्शन घेता येणार नाही. मात्र या कालावधीत भाविकांना गणपतीच्या प्रतिमूर्तीचे दर्शन घेता येईल. सोमवारी १५ जानेवारी रोजी गणेशमूर्तीचे पूजन आणि आरती झाल्यानंतर दुपारी एक वाजता भाविकांना नेहमीप्रमाणे गाभार्‍यातून दर्शन घेता येईल, अशी माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.