रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 मार्च 2022 (21:09 IST)

दानवे यांचा नाशिक दौरा वादग्रस्त होण्याची चिन्हे

नाशिकमध्ये उद्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे येणार आहेत, मात्र हा दौरा वादग्रस्त होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काही दिवसांपूर्वी दानवे यांनी शिवाजी महाराज यांच एकेरी उल्लेख केल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दानवे यांचा होऊ देणार नसल्याचा इशारा या संघटनांमार्फत देण्यात आला आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा उद्याचा दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
दरम्यान काही दिवसांपूर्वी दानवे यांनी शिवाजी महाराज यांच एकेरी उल्लेख केला होता. यानंतर राज्यभर मराठा संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात येत होता. आता ते नाशिक दौऱ्यावर येत असताना नाशिकमधील मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने दानवे यांच्या विरोधात उद्या गनिमीकावा ने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
या प्रकरणी मराठा संघटनांची मागणी आहे की , रावसाहेब दानवे उद्या नाशिक मध्ये माफी न मागता आले तर त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. तर दानवे यांच्या दौऱ्यापूर्वी मराठा संघटनांच्या काही कार्यकर्त्यांना नोटीस देण्यात आली आहे. याचबरोबर मराठा क्रांती मोर्चा समन्वयक करण गायकर यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे दानवे यांचा दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.