ganesh chaturthi
✕

Sindhudurg आयुष्यात स्ट्रगल करणं कठीण आहे, मित्राला मेसेज करून आत्महत्या

Updated: मंगळवार, 19 डिसेंबर 2023 (12:38 IST)
 
''मला आयुष्यात स्ट्रगल करणे खूप कठीण आहे. तसे माझ्या घरातील लोकांना समजावून सांग'', असा मेसेज तरुणाने आपल्या खास मित्राला पाठवून गळफास घेत आत्महत्या केली. शिरशिंगे वीरवाडी येथील 22 वर्षीय तरुणाने माजगाव येथे भाड्याच्या घरात हे टोकाचं पाऊल उचललं. साहिल सुनिल राऊळ असं त्याचं नाव आहे. साहिल चार दिवसांपूर्वी माजगाव येथे राहायला होता. 
 
मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावामध्ये राहणाऱ्या साहिलने आयटीआयचे शिक्षण घेतले होते. तो माजगाव उद्यमनगर येथील एका कंपनीत अपरेटिस म्हणून तर संध्याकाळी शहरातील एका चायनिजच्या दुकानात काम करत होता. सोमवारी दुपारी त्याचा मित्र सुंदर सिताराम राऊळला त्याने दुपारी 12 वाजेच्या सुमारास ''मला आयुष्यात स्ट्रगल करणे कठीण आहे. ते माझ्या घरातील लोकांना समजावून सांग'', असा मेसेज पाठवला. तेव्हा मित्राने काय झाले हे विचारण्यासाठी फोन केला पण त्याने फोन उचलला नाही. त्यामुळे त्याला संशय आल्याने तात्काळ भाऊ न्हानू सोबत ते शिरशिंगे येथून माजगाव येथे आले.
 
माजगाव येथे येताच भाड्याच्या खोलीत जाऊन पाहणी केल्यास साहिलचा मृतदेह फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. नंतर याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments