गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 नोव्हेंबर 2023 (07:44 IST)

सावंतवाडीत खवले मांजराच्या खवल्यांच्या तस्करी प्रकरणी दोघांना अटक

सावंतवाडी वनपरिक्षेत्राच्या पथकाकडून बुधवारी दुपारी बांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातून दोघांना खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करून व्यवहार करत असताना ताब्यात घेतले. संबंधितांकडून सुमारे २ किलो वजनाचे खवले व हिरोहोंडा दुचाकी ( जीए ०९ सी ६६९६ ) देखील जप्त करण्यात आली.
 
 वन विभागाला मिळालेल्या गुप्त महितीच्या अनुषंगाने सावंतवाडी वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक प्रकाश रानगिरे, अप्पासो राठोड यांच्या पथकाने बांदा येथे सापळा रचला. रचलेल्या सापळ्यानुसार संबंधित खवले मांजराच्या खावल्यांच्या विक्रीचा व्यवहार कारण्यासाठी बांदा येथे दुपारच्या दरम्यान आले असता वन विभागाच्या टीमने त्यांच्यावर झडप घालून ताब्यात घेतले. नारायण सावळाराम नाईक, (वय-४८ वर्षे ) व सद्गुरू मारुती नाईक (वय – ५२ वर्षे ) अशी त्यांची नावे आहेत.ताब्यात घेतलेल्या व्यक्तींकडून अंदाजे २ किलो वजनाचे खवले मांजराचे खवले व एक दुचाकी (अंदाजे रक्कम- ५० हजार रु.) हस्तगत करण्यात आली. सदरच्या अटक आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम- १९७२ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना उद्या सावंतवाडी कोर्टमध्ये हजर केले जाईल. सदरची कारवाई ही सावंतवाडी उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, सहाय्यक वनसंरक्षक सुनिल लाड यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल पृथ्वीराज प्रताप, वनरक्षक प्रकाश रानगिरे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.