शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2022 (10:06 IST)

वरातीत गाणं गाणाऱ्या महिलेचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू

death
माणसाचं मरणं कधी आणि कुठे येईल काही सांगता येत नाही. परभणीत एका लग्न सोहळ्यात गाताना हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. संगीता गव्हाणे असे या मयत महिलेचं नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या पाथरी रोडवर 22  मे रोजी लग्न सोहळा सुरु होता. सर्व व्हराडी बँडच्या तालावर नाचत होते. त्या वरातीत संगीता या गाणं गात होत्या. गात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्या खाली कोसळल्या. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.