शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (13:22 IST)

सेल्फी काढण्याच्या नादात जीव गेला, पाण्यात बुडाले सख्खे भाऊ

भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाच्या कॅनालमध्ये बुडून दोन सख्ख्या भावंडाचा मृत्यू झाला. धरणाच्या पॉवर हाऊसच्या पाण्याजवळ सेल्फी काढतांना तोल गेल्याने दोन्ही भावडांचा बुडून मृत्यू झाला आहे. दोघेही नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रहिवासी आहे. 
 
विनोद मधुकर जुनघरे (वय 35) आणि मंगेश मधुकर जुनघरे (वय 37) अशी त्यांची नावे आहेत. दोघे भाऊ स्वातंत्र्य दिनानिमित्त धरणावर फिरायला गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. पाण्याच्या प्रवाहात उतरून सेल्फी काढण्याच्या नादात तोल गेल्याने दोन्ही भावडांचा बुडून मृत्यू झाला आहे. या दोन्ही भावांचा धरणाच्या पाण्यात शोध घेतला जात आहे. याप्रकरणी रविवारी रात्री दहा वाजेपर्यंत पवनी पोलीस ठाण्याचे कर्मचारी बचाव पथकाच्या मदतीने त्या दोघांचा शोध घेत आहेत.
 
उमरेड तालुक्यातील विनोद आणि मंगेश हे दोन्ही भाऊ मित्रा सोबत पर्यटनासाठी गोसेखुर्द धरणावर आले होते. त्यावेळी धरणाच्या पॉवर हाऊसजवळ सेल्फी काढण्याचा मोहात येऊन विनोद पाण्याजवळ उतरला आणि त्याचा पाय घसरला. तो वैनगंगा नदीच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला तेव्हा मोठा भाऊ मंगेश याने विनोदला वाचवण्यासाठी नदी पात्रात उडी मारली. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने तोदेखील पाण्यात वाहून गेला.
 
या घनटेची माहिती मिळतचा पवनी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि नदीपात्रात या दोन्ही भावंडांचा शोध सुरू केला.