मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (08:08 IST)

येवल्यात धक्कादायक प्रकार; प्रातांधिकारीवर शरीर सुखाची मागणी केल्याचा महिला तलाठीचा आरोप

yewala women accused Pratandhikari of demanding bodily pleasures
येवला उपविभागीय अधिका-यांनी तलाठींच्या बदल्या सध्या वादग्रस्त ठरल्या आहे. यातील काही तलाठ्यांनी थेट मॅटमध्ये धाव घेतली आहे. मॅटने या निर्णयास २३ ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली आहे. तर एका महिलेने उपविभागीय अधिका-यांनी वारंवार घरी बोलावून शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. दुस-या तलाठी महिलेने पैसे मागीतल्याचा आरोप केला आहे. या दोन्ही महिलांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांनी माझ्यावर केलेले आरोप हे केवळ मला बदनाम करण्यासाठी तसेच दबाव टाकण्यासाठी असल्याचे म्हटले आहे. आम्ही सुद्दा मॅटमध्ये आमची बाजू मांडल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
 
येवला येथील तलाठ्यांच्या बदली प्रक्रीयेत मनमानी कारभार करत जातीय व्देषभावनेतून या बदल्या केल्या असल्याची तक्रार करत काही तलाठ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठवला आहे. तलाठी विरूध्द उपविभागीय अधिकारी हे प्रकरण सध्या येवला तालुक्यात चर्चेचा विषय बनले आहे. येवला येथील उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांनी आपल्या मनमानी कारभाराने तलाठ्यांच्या बदल्या केल्या आहेत. जे तलाठी बदलीस पात्र नव्हते त्यांच्या बदलीचे आदेश काढले तर ज्या तलाठ्यांनी विनंती बदलीची मागणी केली त्यांना दुसराच सज्जा देण्यात आला. मर्जीतील तलाठ्यांना मात्र त्यांच्या जागेवर कायम ठेवण्यात आले असून ठाणमांड्या, मर्जीतील कर्मचार्‍यावर उपविभागीय अधिकारी मेहरबान असल्याचे दिसून येत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. या बदली प्रक्रीयेविरोधात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे.