शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (08:10 IST)

स्वातंत्र्यदिनी लाच स्विकारताना महिला ग्रामसेवक ACB च्या जाळ्यात

देशभरात 75 स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा होत असताना गडचिरोली तालुक्यातील मरेगाव येथील महिला ग्रामसेवक प्रीती लक्ष्मीकांत त्रिशुलवार (वय-35) यांना 2 हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा  रचून अटक केली. अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलेचे मानधन देण्यासाठी दोन हजारच्या लाचेची मागणी प्रीती त्रिशुलवार यांनी केली होती.
 
मिळालेल्या माहितीनुसार, तक्ररारदार महिला ग्रामपंचायत कार्यालयाकडून तिच्या मानधनाचा धनादेश घ्यायचा होता. परंतु धनादेश देण्याच्या मोबदल्यात ग्रामसेवक प्रीती यांनी पंचासमक्ष 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीमध्ये दोन हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले. याप्रकरणी स्वयंपाकी महिलेने गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे  तक्रार केली.
 
महिलेच्या तक्रारीवरुन एसीबीच्या पथकाने  मरेगाव ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचला. यावेळी तक्रारदार महिलेकडून 2 हजार रुपयांची लाच स्विकारताना प्रीती त्रिशुलवार यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ग्रामसेवक प्रीति त्रिशुलवार यांच्यावर आरमोरी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.