1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. sister inlaws murder dewar also died in an accident while running away

भावजयीचा खून, पळून जाताना अपघातात दीराचाही मृत्यू

शेती आणि जनावरे सांभाळण्याचे काम करावे लागणार असल्याच्या रागातून एकाने आपला सावत्र भाऊ आणि भावजयीवर चाकूहल्ला करीत डोक्यात लोखंडी डंबेल्स घातल्याने भावजय जागीच ठार झाली; तर भाऊ गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर दुचाकीवरून पळून जाणारा हल्लेखोरही मोटारीला धडकून मरण पावला. आंबळे (ता. शिरूर) येथे आज पहाटे चार ते पाचच्या दरम्यान हा थरार घडला.
 
अनिल बाळासाहेब बेंद्रे (वय २५) असे मृत झालेल्या हल्लेखोराचे नाव आहे. त्याने केलेल्या हल्ल्यात प्रियांका सुनील बेंद्रे (वय २८) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील बाळासाहेब बेंद्रे (वय ३०) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत आणि जखमी हे तिघेही उच्चशिक्षित असून, या घटनेने आंबळे परिसरात खळबळ उडाली आहे. बाळासाहेब पोपट बेंद्रे (रा. अंब्याचा मळा, आंबळे, ता. शिरूर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.
Edited by : Ratnadeep Ranshoor
पुढील लेख
बुद्धांच्या आचारविचारांचे विविध देशांमधील प्रतिबिंब अजिंठा-वेरुळ लेण्यांच्या परिसरात बघता येणार