मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 2 मे 2023 (21:24 IST)

Indore News: इंदूरमध्ये भीषण अपघात, क्रेनने अनेकांना चिरडले, 5 जणांचा मृत्यू

Accident in Banganga area of Indore: इंदूरमधील बाणगंगा परिसरात मंगळवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. 
 
इंदूरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, बाणगंगा पुलाजवळ क्रेनने मोटारसायकलस्वाराला चिरडले. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बाणगंगा परिसरातील भगतसिंग नगरजवळ काही लोक क्रेनच्या धडकेत आले. यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले.
 
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वेगवान क्रेनने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये एका मुलाचाही समावेश आहे.
 
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा एक क्रेन आणि बस सुसाट वेगाने जात होत्या. त्यानंतर पुलाजवळ क्रेनने काही लोकांना चिरडले.
या अपघातात एका मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला.तर काही जण जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.   
 
Edited By - Priya Dixit