शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2023 (09:01 IST)

बार्शीत फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 5 जणांचा मृत्यू

सोलापुरच्या बार्शी तालुक्यातील फटाका कारखान्यात  भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत कारखान्यातील 5 कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर 20 ते 22 कामगार गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत फटाक्यांचा कारखाना आाहे. या कारखान्यात 40 कामगार फटाके तयार करण्याचे काम करत होते. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अचानक कारखान्यात मोठा स्फोट झाला. या स्फोटात 5 कामगारांचा मृत्यू झाला असून, 20 ते 22 कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
स्फोटामुळे परिसरात धुराचे आणि आगीचे लोट पसरले असून, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस आणि प्रशासन स्थानिकांच्या मदतीने घटनास्थळी बचावकार्य राबवत आहे.