1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Sitting pressed Siblings injured in leopard attack Marathi regional News

दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात बहिण-भाऊ जखमी

जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडतच आहे. नुकतेच असाच एक प्रसंग एका बहीणभावावर ओढवला आहे. बहिण-भाऊ मोटरसायकल वरून घरी जात असताना घराजवळच उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
 
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात हि घटना घडली असून अचानक झालेल्या या हल्ल्यात दोघे भाऊ – बहीण जखमी झाले आहे.
दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. प्रवीण नरोडे आणि पूजा नरोडे असे जखमी झालेल्या बहीण-भावंडांचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी,
कोल्हेवाडी येथील नरोडे मळ्या मध्ये राहणारे प्रवीण नरोडे त्याची बहीण पुजा नरोडे हे दोघे घरी परतत असताना घराच्याजव आलेअसता अचानक उसाच्या शेतात दबा धरून बस लेल्या बिबट्याने त्यांच्यावर झेप घेऊन हल्ला केला.
यावेळी ते दोघे भाऊ बहीण गाडीवरून खाली पडले, अन बिबट्या त्यांच्या अंगावर धावून गेला असता दोघा नीही मोठ्या मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून उसात लपला.
परंतु पुन्हा त्याने अचानक दोघांवर हल्ला करून पूजा नरोडे हिचा पायाला चावा घेत जखमी केले. प्रवीण याला बिबट्यााची नखे लागल्याने तो जखमी झाला.
दोघा बहिण भावाला उपचारासाठी घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले, मात्र बहीण पूजा ही जास्त जखमी असल्यामुळे तिला पुढील उपचारा साठी नाशिक येथे नेण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुढील लेख
खतांच्या किंमतींमध्ये जबरदस्त वाढ; शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट