रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मुंबईत आकाश कंदील उडवण्यावर बंदी

मुंबई- दिवाळीत आकाश कंदील उडवण्यावर मुंबई पोलिसांनी बंदी घातली आहे. उडत्या दिव्यांमुळे आग लागून दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
 
नगर पोलिसाने लक्ष्मी पूजन अर्थात 30 ऑक्टोबर रोजी आवाज करणारे फटाके चालवण्याची परवानगी मध्य रात्रीपर्यंत देण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी निर्धारित वेळ दोन तास वाढवली असून 12 वाजेपर्यंत केली आहे.
नगर पोलिस प्रवक्ता डीसीपी अशोक दुधे यांनी सांगितले की अग्निशमन दलाकडून सल्ला आल्यानंतर दिवाळीदरम्यान मुंबईच्या जवळपास कंदील उडवण्यावर बंदी घातली आहे. अश्या कंदीलांमुळे गेल्या काही वर्षात काही इमारतींमध्ये आग लागण्याचा दुर्घटना घडल्या आहेत.
 
दिवाळीत पेटते दिवे, आकाशी पतंग,फ्लाइंग लॅण्टेन उडविले जातात. दूरवर जाऊन ते एखाद्या इमारत, घरावर, वस्तीवर पडण्याची शक्यता असते, ज्याचे परिणाम गंभीर असतात, अशी सूचना अग्निशमन दलाकडून पोलिसांना करण्यात आली. त्यानुसार येत्या 15 दिवसांसाठी फ्लाइंग लॅण्टेन उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. असा प्रकार करणार्‍यावर कारवाई केली जाईल.