बुधवार, 29 नोव्हेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (09:38 IST)

सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेच राहतील

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पालकमंत्री पदावरुन हटवण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे. उजनी धरणाच्या पाण्यावरुन झालेल्या वादामुळे पालकमंत्री बदलण्याबाबत चर्चा सुरु होत्या. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे पालकमंत्री बदलणार का याबाबत तर्क वितर्क लढवण्यात आले. परंतु यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यानी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेच राहतील असे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पालकमंत्री बदलीच्या चर्चांना ब्रेक लावला आहे. दत्तात्रय भरणेच सोलापूरचे पालकमंत्री असणार आहेत असे  म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती. याबाबत दत्तात्रय भरणे यांनीही माहिती दिली आहे. तसेच उजनी पाणी प्रश्नाचा वाद मागेच मिटला असल्याचेही सांगितले आहे.