सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (22:07 IST)

नाशिकमध्ये युरोपातील कोरोनाचा नवा स्ट्रेन ?

नाशिकमध्ये दुबई आणि युरोपातील कोरोनाचा नवा स्ट्रेन आल्याची माहिती मिळाली आहे. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने हे स्पष्ट केलं आहे. नेहमीपेक्षा 60 टक्के वेगाने हा नवा कोरोना स्ट्रेन पसरतो. जुलाब होणे, उन्हाळी लागणे किंवा कुठलीच लक्षणे नसणे अशी त्याची लक्षणे आहेत. घरातील अनेकांना एकाचवेळी हा कोरोना संसर्ग होऊ शकतो. स्वॅब टेस्टिंगमध्ये कोरोनाचे काही घटक मिसिंग दिसतात. 

याबाबत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिककरांना सावधगिरीचा इशारा दिलाय. तर दातार जेनेटिक्स या  प्रयोगशाळेच्या अधीक्षकांनी देखील या नव्या स्ट्रेनबाबतत दुजोरा दिलाय. मात्र दुसरीकडे राज्याच्या आरोग्य सचिवांनी हा नवा स्ट्रेन नसल्याचा दावा केलाय.