शुक्रवार, 12 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (21:29 IST)

कोविड लस पूर्णपणे सुरक्षित आहे- आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी लसांमुळे भारतातील कोरोनाव्हायरस विषयी असणारी शंका फेटाळून लावली आणि जगभरातील वैज्ञानिक विश्लेषणेनंतर मान्यता देण्यात आली आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. हर्षवर्धन यांनी लोकसभेत प्रश्नकाळाच्या वेळी सांगितले की, कोरोना विषाणूच्या लसीमुळे आगामी काळात हानी होणार नाही अशी भीती देश व जगातील बर्‍याच लोकांना आहे?
 
ते म्हणाले, "कोव्हीशील्ड आणि कोवॅक्सीन या दोन लसांना भारतात वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ते सुरक्षितता, परिणामकारकता आणि रोग प्रतिकारशक्ती या निकषांवर पूर्णपणे उतरतात. खालील सदनात काँग्रेस संसद रवनीत सिंह बिट्टू यांच्या पुरवणी प्रश्नांचे उत्तर देताना ते म्हणाले की कोविड लसीबाबत देशवासियांना कोणते ही गोंधळ होऊ नये 

ते म्हणाले की पूर्णपणे वैज्ञानिक चाचण्यांनंतर पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने दिलेल्या लसीच्या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा.आणि आपल्या जवळच्या खासगी किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधक लस घेऊन स्वतःला सुरक्षित करावे. बिट्टू यांनी कोरोना लसीचा परिणाम भविष्यात लोकांच्या डीएनए वर होण्याच्या शक्यते बाबत प्रश्न विचारले होते 

आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले की,आजच्या काळात लसीकरण लागू केल्यावर बऱ्याच आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूवर आळा बसेल.लसींच्या मदतीने देशातून चेचक,आणि पोलिओ सारख्या रोगांचा नाश झाला आहे आणि आता केवळ दोन देशांमध्ये पोलिओ आहे ते ही आता संपुष्टतात येण्याचा मार्गावर आहे. ते म्हणाले की बऱ्याच पातळ्यांवर बऱ्याच लोकांवर चाचण्या केल्यावर समाजात वापरण्यासाठी लस मंजूर केल्या जातात.  
 
डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, देशात कोरोनाच्या आतापर्यंत सुमारे साढे तीन कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. वैज्ञानिक विश्लेषणानंतर लस मंजूर केली जाते आपल्याला या वर विश्वास ठेवायला पाहिजे.
आम्ही देशातील जनतेला सांगू इच्छितो की लसाबाबत कोणतेही संभ्रम पाळू नका आणि गोंधळू नका .तसेच सरकारने दिलेल्या सुविधेचा फायदा घेऊन आपल्या जवळच्या खासगी किंवा सरकारी रुग्णालयात जाऊन लस घेऊन स्वतःला आणि इतर लोकांना देखील सुरक्षित करा.