मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (21:51 IST)

वाचा, राज्य शासनाच्या कोरोना नव्या सूचना

महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला आहे. आणि त्यामुळेच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनतेला निर्बंधांना सामोरं जावं लागत आहे. यात सर्व खाजगी कार्यालयांमध्ये 50 टक्के क्षमतेनेच कर्मचारी उपस्थित ठेवण्याबाबत आदेश दिले आहेत. यामध्ये आरोग्य आणि इतर अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कार्यालयांना वगळण्यात आलं आहे.
 
याशिवाय सरकारी कार्यालयांचा विचार केला तर, सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग प्रमुखांनी कोरोनाची परिस्थिती कशी आहे, हे पाहावं आणि त्यानुसार कार्यालयात किती कर्मचारी बोलवावे, याबाबत निर्णय घ्यावा, असा आदेश दिला आहे.
 
राज्य शासनाच्या कोरोना नव्या सूचना
राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी संख्या ठेवा
नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के संख्या असावी
आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळण्यात आलं
सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे
धार्मिक, सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही