शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नागपूर , शुक्रवार, 19 मार्च 2021 (07:22 IST)

नागपुरात रेकॉर्डब्रेक 3796 बाधित रुग्ण, 23 जणांचा मृत्यू

नागपूरसह विदर्भात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच चालला असून २४ तासात रेकॉर्डब्रेक 3796 बाधित रुग्ण आढळले असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1277 रुग्ण बरे झाले आहे. नागपूर जिल्ह्यात 23614 ऍक्टिव्ह रुग्ण आढळल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी बेजबाबदार नागरिकांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. विदर्भात 4501 बाधित रुग्ण आढळले आहे त्यात वर्ध्यामध्ये 374 रुग्णांचा समावेश आहे तर 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
24 तासात नागपुरात 3796 रुग्ण आढळले असून एकट्या नागपूरमध्ये 2913 तर ग्रामीणमध्ये 880 तर इतर जिल्ह्यात 3 रुग्णांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात 23 रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरात 14 ग्रामीणमध्ये 6 इतर जिल्ह्यातील 3 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत 4528 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1277 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 84.58 टक्के आहे. आजपर्यंत बाधित रुग्णांची संख्या 182552 पोहोचली आहे.
 
नागपूर जिल्ह्यात गुरुवारी 23614 ऍक्टिव्ह रुग्ण आढळले असून शहरात 19066 तर ग्रामीणमध्ये 4548 रुग्णांचा समावेश आहे. शहरात 16139 चाचण्या झाल्या असून शहरात 10800 तर ग्रामीणमध्ये 5339 चाचण्या घेण्यात आल्या