सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मार्च 2021 (09:19 IST)

कोरोनाची भीती, अहमदाबादमधील जिम, स्पोर्ट्सक्लब बंद, उत्तरप्रदेशात कलम 144 लागू

Coronavirus Second Wave: पुन्हा एकदा देशात कोरोनाचा ग्राफ चढू लागला आहे. कोरोनाचे वाढते प्रकरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर बर्‍याच राज्यांनी पुन्हा एकदा बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे अहमदाबादामध्ये पुन्हा एकदा जिम, स्पोर्ट्स क्लब, गेमिंगझोन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बहुतांश दिल्लीला लागून उत्तर प्रदेश,नोएडा आणि गाझियाबाद येथे कलम 144 लागू करण्यात आली आहे. भारतातील कोरोना संसर्गाची वाढती गती बुधवारी, 102 दिवसानंतर, कोरोनाचे, 35,886 रुग्ण आढळून आले आहे यावरून हे लक्षात येते. पुन्हा एकदा कोरोनाहून सर्वाधिक त्रस्त महाराष्ट्र दिसला. 
 
आतापर्यंत ज्या राज्यात कमी प्रकरणे आढळली त्या राज्यातही आता नवीन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. याच अनुक्रमे गेल्या 24 तासांत पंजाबमध्ये 2,039 प्रकरणे नोंदवली गेली. या काळात, साथीच्या आजारामुळे 1,274 लोक बरे झाले आणि 35 लोक मरणपावले. पंजाब व्यतिरिक्त गुजरात, कर्नाटक आणि राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्येही नवीन केसेसची संख्या वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृह राज्य गुजरातमधून 1122 नवीन कोरोना प्रकरणे समोर आली आहेत.775 लोक बरे झाले आहेत आणि साथीच्या आजारामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.गुजरातमधील अहमदाबाद, सुरतं, वडोदरा आणि राजकोट येथे नाईट कर्फ्यू 2 तास वाढविण्यात आला आहे.