रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (13:39 IST)

Solapur: नवीन कार विहिरीत पडून शिक्षकाचा दुर्देवी मृत्यू

well
Solapur:  स्वतःची कार आणि घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्नं असत. सोलापुरातील एका शिक्षकाने देखील कार घेतली. संपूर्ण कुटुंब नवीन कार आल्यामुळे आनंदात होत. पण त्यांच्या आनंदावर विरजण पडले. नवी कार घेतलेल्या शिक्षकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोलापुरातील भाटेवाडी येथे घडली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. इरन्ना बसपा जुजगार असे या मयत शिक्षकाचे नाव आहे. 

जुजगार कुटुंबाने नवी कार घेतली आणि ते कार दाखवण्यासाठी कुटुंबासह आपल्या मेहुण्यांकडे ड्राइव्हरला घेऊन गेले. त्यांना कार चालवता येत नव्हती. 

मोकळ्या जागेत कार चालवण्याचा विचार त्यांनी केला आणि कार चालवण्यासाठी त्यांनी कार सुरु केली मात्र त्यांना तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे कार अनियंत्रित होऊन वेगाने पुढे गेली आणि शिवारातील विहिरीत कोसळली.

कार पाण्यात बुडाली. पाठोपाठ त्यांच्या कुटुंबीयांनी धाव घेत विहिरीजवळ पोहोचले आणि ईरन्ना यांना विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. तब्बल तास भरानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 
 
 Edited by - Priya Dixit