साताऱ्यातील जवान विजय जाधव यांना पुण्यात प्रशिक्षण घेताना वीरमरण
साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातून चिमणगावातील जवान विजय पांडुरं जाधव यांना पुण्यात कॉलेज ऑफ मिलिट्री येथे प्रशिक्षण घेताना धावताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले. ते 39 वर्षाचे होते.
शहीद विजय जाधव हे भारतीय सैन्य दलात 114 बॉम्बे इंजिनिअर ग्रुप मध्ये 21 वर्षांपासून कार्यरत होते. सध्या ते झाशीत आपले देशसेवेचे कर्तव्य बजावत होते. पुण्यात प्रशिक्षण घेताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांना वीरमरण आले. त्यांनी महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण केल्यांनतर 2001 मध्ये साताराच्या पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले होते. नंतर त्यांनी पुण्यातील बॉम्बे इंजिनिअर येथे प्रशिक्षण घेतले नंतर त्यांची नेमणूक पतियाळा या ठिकाणी झाली. त्यांनी अमृतसर, श्रीनगर, झाशी आणि पुण्यात नाईक आणि हवालदार पदावर आपले कर्तव्य बजावले आहे. पुण्यात त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, २ मुलं आई, वडील, भाऊ, पुतण्या असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
Edited by - Priya Dixit