शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 23 एप्रिल 2023 (16:53 IST)

फरशी पुसताना फिनेलच्या पाण्याने घेतला बाळाचा जीव

baby
फरशी पुसताना (Floor Mopping) काळजी घेणे कधीही चांगले. आणि घरात लहान बाळ असेल तर जास्त  काळजी घेण्याची गरज आहे  नाहीतर काहीही अघटित घडू  शकते.साताऱ्यात फिनेलच्या पाण्यामुळे एका नऊ महिन्याच्या चिमुकल्या बाळाचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. श्रीनाथ अशोक धायगुडे असे या मयत बाळाचे नाव आहे.सदर घटना महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खंडाला तालुक्यात मोरवे गावातील आहे. अशोक महादेव धायगुडे यांच्याकडे दररोज प्रमाणे स्वच्छता आणि फरशी पुसण्याचे काम त्यांच्या पत्नी करत होत्या. 
 
अशोक धायगुडे यांना तीन मुलीनंतर मुलगा झाला होता.बाळाची आई फरशी पुसून कचरा बाहेर टाकायला गेली असताना बाळा रांगत आला  आणि भरलेल्या पाण्याच्या बादलीत पडला. बादलीत पडल्यानंतर बाळाचा फिनेलच्या वासाने गुदमरून मृत्यू झाला.

बाळाला तातडीने रुग्णलयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.अचानक घडलेल्या या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला असून गावातही शोककळा पसरली आहे.

तीन मुलीनंतर मुलगा झाला होता. गेल्या नऊ महिन्यांपासून घरात आनंदाचं वातावरण होतं. बाळाचे लाड, कौतुक केलं जात होतं. पण नियतीने कुटुंबाचा हा आनंदच हिरावून घेतला आहे.घर पुसणाऱ्या फिनेल मुळे एका चिमुकल्याचा जीव गेला.
 
Edited By - Priya Dixit